Vande Bharat: ‘या’ 7 वंदे भारत एक्सप्रेसचे डबे वाढवले जाणार, महाराष्ट्रातील एका मार्गाचा समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या ट्रेनमधील गर्दीही वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेने सात प्रमुख मार्गांवरील वंदे भारत गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त सीट्स मिळणार आहेत. तसेच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या मार्गांवरील डब्यांची संख्या वाढणार
मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल
सिकंदराबाद-तिरुपती
चेन्नई एग्मोर-तिरुनेलवेली
मदुराई-बेंगळुरू कॅन्ट
देवघर-वाराणसी
हावडा-राउरकेला
नागपूर-इंदूर

वंदे भारतमधील डब्यांची संध्या 20 पर्यंत वाढणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या मार्गांवर 8 कोच असलेल्या 4 वंदे भारत गाड्या आणि 16 कोच असलेल्या 3 वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र आता डब्यांच्या सख्येत वाढ होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, “16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनमधील डब्यांची संख्या 20 पर्यंत वाढवली जाणार आहे. तसेच 8 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनमधील डब्यांची संख्या 16 पर्यंत वाढवली जाणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *