New cancer cure found: कॅन्सर रुग्णांसाठी नवी आशा : थेट कर्करोगाच्या ट्यूमरला नष्ट करणार ‘ही’ थेरेपी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। कॅन्सर उपचाराच्या जगात जपानी शास्त्रज्ञांनी अशी मोठा शोध लावला आहे. हा शोध पुढील काही वर्षांत वैद्यकीय शास्त्राची दिशा बदलू शकणार आहे. जपान अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (JAIST) मधील संशोधकांनी एक बॅक्टेरिया-आधारित थेरपी विकसित केली आहे. जी शरीराच्या इम्यून सिस्टिमची मदत न घेता थेट कॅन्सर ट्यूमरवर हल्ला करून त्याला नष्ट करू शकते. या उपचाराला AUN बॅक्टेरिया कॅन्सर ट्रीटमेंट असं नाव दिलं गेलं आहे.

१५० वर्ष जुन्या प्रयोगातून नवी क्रांती
कॅन्सरवर संशोधन करताना शास्त्रज्ञांनी नेहमी शरीरातील इम्यून सिस्टिमला मजबूत करून कॅन्सरशी लढण्याचा प्रयत्न केला. १९व्या शतकाच्या शेवटी डॉ. विल्यम कोली यांनी यावर सर्वात पहिला प्रयोग केला. तोच पुढे जाऊन आधुनिक इम्यूनोथेरपीचा पाया ठरल्याची नोंद आहे.

यामधील सगळ्यात मोठी अडचण ही होती की, ज्यांचं इम्यून सिस्टिम कमकुवत होतं अशा रुग्णांना या उपचाराचा फारसा फायदा होत नव्हता. हीच उणीव भरून काढण्यासाठी JAIST च्या शास्त्रज्ञांनी अशी पद्धत तयार केली आहे जी इम्यून सिस्टिमवर अवलंबून नसून थेट कॅन्सर पेशींवर हल्ला करते.

एयूएन थेरपी कशी काम करते?
ही थेरपी दोन वेगवेगळ्या बॅक्टेरियांच्या मिश्रणातून बनवली आहे.

A-gyo – हा बॅक्टेरिया थेट ट्यूमरपर्यंत पोहोचतो आणि कॅन्सर पेशी व त्यांना पोसणाऱ्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करतो.

UN-gyo – हा बॅक्टेरिया A-gyo च्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो जेणेकरून संसर्ग शरीरात पसरू नये आणि तो फक्त ट्यूमरपुरताच मर्यादित राहावा.

महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी इंजेक्शनद्वारे ही थेरपी देतात तेव्हा मिश्रणात साधारण ३% A-gyo आणि ९७% UN-gyo असतो. पण ट्युमरच्या आत पोहोचल्यावर हा अनुपात बदलतो आणि जवळपास ९९% A-gyo एक्टिव्ह होतो. या बदलामुळे ट्यूमर पटकन नष्ट होतो आणि त्याचवेळी साइड इफेक्ट्सवरही नियंत्रण राहते.

इम्यूनो थेरेपीपेक्षा मोठा फरक
सध्या उपलब्ध असलेली इम्यूनोथेरपी CAR-T किंवा Checkpoint inhibitors फक्त तेव्हाच काम करतात जेव्हा शरीराचा इम्यून सिस्टिम मजबूत असते. पण एयूएन थेरपी पूर्णपणे इम्यून-इंडिपेंडंट आहे. म्हणजेच इम्यून सिस्टिम कमकुवत असतानाही ही थेरपी ट्यूमर नष्ट करू शकते.

यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की, ज्या मॉडेलमध्ये इम्यून सिस्टिम कमजोर होती त्यातसुद्धा ट्यूमर पूर्णपणे नष्ट झाला. त्याशिवाय गंभीर दुष्परिणाम जसं की, सायटोकिन रिलीज सिंड्रोम आढळले नाहीत.

रुग्णांसाठी नवी आशा
आत्तापर्यंतच्या उपचारांमधून आराम न मिळालेल्या रुग्णांसाठी ही थेरपी नवा आशेचा किरण ठरू शकते. या संशोधनाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक एजिरो मियाको यांनी सांगितलं की, पुढील काही वर्षांत याचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची तयारी आहे. शास्त्रज्ञांचा उद्देश आहे की, पुढील ६ वर्षांत ही नवी तंत्रज्ञान प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *