महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। तब्बल 50 KM पर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या. चंदीगड-कुल्लू दरम्यान भारतातील आजपर्यंतचा सर्वात मोठा ट्रॅफिक जाम लागला. यामुळे दिल्लीला येणारे हजारो मालवाहू ट्रक या वाहतूक कोंडीत अडकले. एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेले कुल्लू आज विनाशाचा सामना करत आहे. रस्ते बंद झाल्यामुळे संपूर्ण परिसर ठप्प झाला आहे. सुमारे 50 किलोमीटर जाममध्ये अडकलेल्या या ट्रकमध्ये कोट्यवधी रुपयांचे सफरचंद, टोमॅटो आणि इतर भाज्या वाया जात आहेत. चंदीगड-कुल्लू महामार्ग लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला. मात्र, ट्रक अनेक तास अडकलेले होते.
फळे आणि भाज्यांनी भरलेल्या ट्रकची किंमत सुमारे 4 ते 4.5 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार, 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सफरचंद अडकली आहेत. चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद पडला आहे आणि तासन्तास अडकून पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. हिमाचल प्रदेशातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. येथे सततच्या मुसळधार पावसामुळे कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. चंदीगड-कुल्लू महामार्गावर भूस्खलनामुळे हजारो ट्रक अडकले आहेत. त्यामुळे फळे आणि भाज्या खराब होत आहेत. लहान वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे, परंतु ट्रक अजूनही जाममध्ये अडकले आहेत. राज्यात 534 रस्ते बंद करावे लागले आहेत आणि 1,184 ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
लहान वाहनांसाठी महामार्ग खुला करण्यात आला आहे, परंतु ट्रक अजूनही अडकलेले आहेत. मंडी आणि कुल्लू दरम्यान अर्धा डझन ठिकाणी भूस्खलन झाले आहे, ज्यामुळे बाहेर काढण्याच्या कामात विलंब होत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो रस्ते बंद आहेत, ज्यामध्ये मंडी आणि कुल्लू हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत, तर वीज आणि पाणीपुरवठा लाइनवरही मोठा परिणाम झाला आहे. 20 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 158 लोकांचा मृत्यू झाला आहे, 38 जण बेपत्ता आहेत. 2,623 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे नुकसान झाले आहे.