Asia Cup IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेला ‘उष्णते’च्या लाटेचा फटका! सामन्यांच्या वेळेत मोठा बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। आशिया चषक स्पर्धेत सुरू होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत. 9 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणारा भारत–पाक सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.

सामन्यांच्या वेळेत बदल
आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार होते. मात्र आता 19 पैकी 18 सामने अर्धा तास उशिरा, म्हणजेच रात्री 8 वाजता खेळवले जातील. उष्णतेमुळे (40 अंशांहून अधिक तापमान) खेळाडूंच्या सोयीसाठी आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार प्रसारकांनी वेळेत बदल मान्य केला आहे.

फक्त 15 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे होणारा यूएई विरुद्ध ओमान सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता खेळवला जाईल.

टी20 फॉरमॅटमध्ये स्पर्धा
आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामने टी-20 फॉरमॅटमध्ये संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी आणि दुबई येथे रंगणार आहेत.

दोन ग्रुपमध्ये विभागणी

ग्रुप-अ : भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान

ग्रुप-ब : हाँगकाँग, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश

स्पर्धेचे नवे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग, अबू धाबी, रात्री 8 वा.

10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई, दुबई, रात्री 8 वा.

11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग, अबू धाबी, रात्री 8 वा.

12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान, दुबई, रात्री 8 वा.

13 सप्टेंबर – बांगलादेश vs श्रीलंका, अबू धाबी, रात्री 8 वा.

14 सप्टेंबर – भारत vs पाकिस्तान, दुबई, रात्री 8 वा.

15 सप्टेंबर – यूएई vs ओमान, अबू धाबी, संध्याकाळी 5.30 वा.

15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग, दुबई, रात्री 8 वा.

16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी, रात्री 8 वा.

17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई, दुबई, रात्री 8 वा.

18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी, रात्री 8 वा.

19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान, अबू धाबी, रात्री 8 वा.

20 सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, दुबई, रात्री 8 वा.

21 सप्टेंबर – A1 विरुद्ध A2, दुबई, रात्री 8 वा.

23 सप्टेंबर – A2 विरुद्ध B1, अबू धाबी, रात्री 8 वा.

24 सप्टेंबर – A1 विरुद्ध B2, दुबई, रात्री 8 वा.

25 सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, दुबई, रात्री 8 वा.

26 सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, दुबई, रात्री 8 वा.

28 सप्टेंबर – अंतिम सामना, दुबई, रात्री 8 वा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *