महाराष्ट्र 24: ऑनलाईन :विशेष प्रतिनिधी: श्री साईनाथ तरुण मंडळाने यंदा आपला ५० वा समाजोत्सव सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी श्रींची आरती अनाथ मुलांच्या हस्ते घडवून आणण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत स्पंदन बालश्रम येथील विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शिधा वाटप करण्यात आले. हा उपक्रम दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर श्री. दिलीप सोनीगरा व श्री. प्रीतम संघवी यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश लंगोटे, स्पंदन बालश्रम संस्थेचे श्री. गणेश म्हसके, श्री. यशवंत नामदे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.