महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक उत्पादनांवरील कर १० टक्के किमान कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, जवळपास १७५ वस्तूंवरील करात कपात केली जाणार आहे. या वस्तूंवरील कर जवळपास १० टक्क्यांनी कमी केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये हायब्रिड कार ते एसी अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तूंवरील कर होणार कमी (GST Rate Reduce On These Products)
मिडिया रिपोर्टनुसार, टॅलक्म पावडर, टूथपेस्ट आणि शॅम्पू यांसारख्या पर्सनल केअर उत्पादनांवरील जीएसी कमी होण्याची शक्यता आहे. हा जीएसटी १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला जाऊ शकतो. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज इंडस्ट्रीजला चालना मिळेल.
एसी आणि टीव्ही या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटीदेखील १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. हा जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला जाऊ शकतो. यामुळे सॅमसंग, एजली या कंपन्यांना फायदा होईल.
लहान हायब्रिड कारवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला जाऊ शकतो. यामध्ये १० टक्क्यांनी कपात केली जाईल. यामुळे मारुती सुझुकी लिमिटेड आणि टोयोटा या कंपन्यांना फायदा होईल.
जीएसटी सुसूत्रीकरण (GST Reforms)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे. ३ ते ४ तारखेला ही बैठक होणार आहे. यामध्ये जीएसटीबाबत निर्णय घेतला जाईल. यामध्ये दैनंदिन वस्तूंवरील कर कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.