महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ सप्टेंबर ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. घरगुती कामे मनाजोगी पार पडतील. पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आपल्या वागण्या बोलण्यात मृदुता दिसून येईल. थोडे कमी बोलण्यावर भर द्या. मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. निर्भीडपणे कार्यरत राहावे. कामातून मिळणार्या फळाकडे फार महत्त्व देऊ नका.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मानसिक स्थैर्य बाळगा. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल. नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. चूक मान्य करावी. नात्यातील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. भौतिक सुखावर खर्च कराल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
बक्षिसास पात्र व्हाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे समाधानकारक रित्या पार पडतील. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढीस लागेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. दिवस बर्यापैकी अनुकूल राहील. ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
आपलाच विचार पारखून घ्यावा. जोडीदाराचा विचार जाणून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्साही राहतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. एखादी नवीन ओळख होईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मनाची चंचलता काबूत ठेवा. तुमचा सल्ला विचारात जाईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. गुंतवणूक करताना सारासार विचार करा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
गूढ विचारात रमून जाल. मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. उगाचच विरोध दर्शवू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
घरातील कामे आवडीने कराल. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवाल. हातातील अधिकारात वाढ होईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. भागीदारीत समाधानी राहाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
बरेच दिवस वाट पाहत असलेल्या उत्तराची प्रतीक्षा संपेल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. जबाबदारी वाढण्याची शक्यता. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल. संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहाल.