महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०५ सप्टेंबर | गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर उफाळून आलेलं आहे. शहरातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी वनराज आंदेकरांचा खून झाला होता. त्याच खुनाचा हा बदला घेतल्याचं बोललं जातंय.
गोविंदा गणेश कोमकर याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोविंदा हा वनराज आंदेकरांच्या हत्येमधल्या मुख्य आरोपी संजिवनी कोमकरचा पुतण्या आहे. आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी गणेश कोमकरचा हा गोविंदा हा मुलगा होता. नाना पेठत ही घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला हत्या झाल्याने पुण्यात तणाव निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची यांची १ सप्टेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. त्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून खून करण्यात आलेला आहे, असं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच आंदेकर टोळीकडून आंदेकर हत्येतल्या आरोपींच्या नातेवाईकांवर पाळत ठेवण्यात येत होती.
हत्या करुन मारेकरी फरार झाले आहेत, पोलिस शोध घेत आहेत. पुण्यातल्या नाना पेठेत हे हत्याकांड घडलेलं आहे. आंदेकर हत्येची घटना जिथे घडली तिथे जवळच आजची घटना घडली आहे. आंदेकर आणि कुमकर यांचं हे गृहयुद्ध उफाळून आल्याचं दिसून येतंय.