महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के महाजन – पुणे – दि. ४ सप्टेंबर – सरकारला विनंती आहे की, कोव्हीड-19 चे सेंटर उभारणे आधी व्हेंटीलेटर व रुग्णवाहिका उत्पादनाचे कारखाने उभारावेत…..कोरोना महामारी येवून सहा महिने झाले. हजारो लोक त्या मुळे बळी पडलेत. कोरोना वर लस येईल तेव्हा येईल तोपर्यंत कोरोना महामारी पासून जिव वाचविण्यासाठी व्हेंटीलेटर व रुग्णवाहिका सारखी साधने उपलब्ध करू शकत नसाल तर नक्कीच सरकारचे नियोजन ढिसाळ आहे असच म्हणाव लागेल. ही अत्यावश्यक साधंने कोणत्या सरकारने उपलब्ध करून द्यावीत हे दोन्ही सरकारने बघाव, पण राजकारण बाजुला ठेवून कोरोना महामारी चे भान असावं हिच अपेक्षा जनतेची आहे.
नुसतेच खाटांचे कोव्हीड सेंटर उभारून काय उपयोग आहे? खाटा तर प्रत्येकाच्या घरी असतात मात्र व्हेंटीलेटर व रुग्णवाहिका नसतात म्हणून सरकारने व्हेंटीलेटर व रुग्णवाहिका तयार करायचे कारखाने उभे करावेत.वाहन निर्मिती करण्यात आपले उद्योजक अग्रेसर आहेत. किंवा अनेक उद्योजकांकडे हजारो वाहने विक्री अभावी पडून आहेत. त्यांचा वापर करून घेता येईल का? तसा विचार करायला हवा…… सर्व सामान्य माणसांबरोबर पोलिस, पत्रकार, पुढारी, डाॅ. सारखे कोरोना योद्धांना सुद्धा या सुविधां वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. जीव गेल्यावर हळहळ करण्या पलीकडे काहीच करता येत नाही…….आता तरी सरकारने या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष द्यावे हिच अपेक्षा……पि.के.महाजन.