महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – हिंगोली – दि. ४ सप्टेंबर – हिंगोली पोलीस स्टेशनं ग्रामीण हद्दीतील आनंदनगर येथील अरुण हनवते यांच्या घरी भाडयाने रूम घेऊन राहणारा संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख )आणि एक महिला यांनी भाड्याच्या खोलीतच बनावट नोटा बनवण्याचा जणू कारखानाच चालू केला होता.
गुप्त माहिती दाराच्या सहाय्याने हिंगोली पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनातं विभागीय पोलीस अधिकारी श्री.रामेश्वर वेजने यांनी व सोबत स.पो.नी ओंमकांत चिंचोलकर पोलीस कर्मचारी रुपेश धाबे ब.नं.930 पो.हे.कॉ.ब. नं. 717 महेश बंडे पो.कॉ.ब.नं 1009 अर्जुन पडघन पो.ना. ब.नं. 885 वसंत चव्हाण.ब.नं.932 म.पो. शी.अशा केंद्रे चा.पो.का.ब.नं.108 विजय घुगे दहशत वादी विरोधी पथक हिंगोली यांनी सापळा रचून आनंदनगर भागातील हनवते यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या घरावर छापा टाकला त्यांना त्या ठिकाणी 100, 200, 500, 2000, रुपयाच्या 17, 45, 350 रुपयाच्या बनावट नोटा व पिवळसर धातूच्या जे सोन्या सारख्या दिसणाऱ्या लक्ष्मी मातेच्या मुर्त्या जे पुरातन काळातील असल्याचे सांगून आम्हाला धन सापडले आहे.सांगून विक्री करून भोळ्या भाबडया नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. व प्रिंट, स्क्यानिग व झेरॉक्स तीनही एकटाच असलेली cenon कंपनीची झेरॉक्स मशीन बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले .
खऱ्या नोटा 20000, एक चार चाकी गाडी जिची किंमत 6, 45000 असून 17, 975रूपयाचे इतर साहित्य असे एकूण 24,30, 325-00 रुपयाचा मुद्दे माल आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख )याच्या कडून जप्त करून अटक करण्यात आली आहे.आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख )यांच्या व छायाबाई गुलाबराव भुक्तार, यांच्या विरुध्द भा.द.वी.389(अ.ब. क.ड.इ.)420.34.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे व सदरची कारवाही उपविभागीय पोलीस अधीक्षक वेजने यांनी केली असे सांगीतले आहे.
