महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०५ सप्टेंबर |टॅरिफच्या वादातून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर दोन्ही देशांमधील संवाद हा जवळपास संपला आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेतून भारताला धमकावले जात आहे. मुळात म्हणजे भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, अशी अमेरिकेची प्रमुख अट आहे. जर भारताने ही अट मान्य केली नाही तर टॅरिफ वाढवला जाईल. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम भारतातील काही उद्योगांवर झालाय. भारत हा यामुळे मार्ग काढत आहे. यादरम्यानच्या काळात भारत आणि चीनमधील जवळीकता वाढली आहे. दोन्ही देशांनी महत्वाचे करार केले. भारत, रशिया आणि चीन एकचा मंचावर आले.
आता अमेरिकेकडून याच पार्श्वभूमीवर मोठा धक्का देण्याचे काम करण्यात आले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी घोषणा केले की, काही मध्य अमेरिकन नागरिकांवर नवीन व्हिसा निर्बंध लादले जात आहेत, याचे कारण हे चीन आहे. परराष्ट्र विभागाने निवेदन जारी केले. जे या नियमांचे पालन करतात, त्यांच्या कुटुंबियांसह, त्यांना आता अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे थेट म्हणण्यात आलंय. थोडक्यात काय तर आता चीनचा सपोर्ट करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाहीये.
अमेरिकेतील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी आणि कायदा कमकुवत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. आता अशा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल, असे सांगण्यात आलंय. रुबियो यांनी म्हटले की, हा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आम्हाला शक्य ते सर्व पाऊले आम्ही उचलू.
तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार, हे धोरण मध्य अमेरिकेत चीनच्या वाढत्या उपस्थितीबद्दल आहे. चीनमुळे सरकार चिंतेत आहे. आता थेट मोठे कडक पाऊल हे उचलण्यात आलंय. दुसरीकडे टॅरिफच्या मुद्द्यावर चीनने अमेरिकेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनवर सध्याच अमेरिकेने टॅरिफ लावला नाहीये. मात्र, 90 दिवसांच्या कालावधीनंतर तो लावला जाईल, त्यापूर्वीच चीन हे अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात मैदानात उतरला आहे.