Donald Trump: “पंतप्रधान मोदींशी मैत्री कायम राहील, पण…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०६ सप्टेंबर | आपल्या वक्तव्यांनी आणि कृतींनी भारताशी संबंध बिघडवणारे डोनाल्ड ट्रम्प आता डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहेत. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खास मित्र असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी जेव्हा त्यांना भारत-अमेरिका संबंधांबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, ते नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र राहतील. याचबरोबर भारत-अमेरिकेतील संबंध खास असल्याचेही म्हटले. यावेळी त्यांनी असेही म्हटले की दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काळजी करण्यासारखे काहीही नाही. पण, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या सध्याच्या काही धोरणांशीही असहमती व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. पण सध्या मला त्यांची काही धोरणे आवडत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी असे क्षण येतात.”

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सोशल मीडियावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. यावेळे त्या फोटोला ट्रम्प यांनी, “असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनसमोर गमावले आहे. त्यांचे एकत्र भविष्य दीर्घ आणि समृद्ध असो!”, असे कॅप्शन दिले होते.

‘स्मार्ट वर्गखोल्यांपेक्षा स्मार्ट शिक्षक महत्त्वाचे’
ट्रम्प यांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. यावर ते म्हणाले, “मला वाटत नाही की असे काही घडले आहे. हो, भारत रशियाकडून इतके तेल खरेदी करत आहे याबद्दल मी निश्चितच निराश आहे. मी त्यांना हे स्पष्ट केले आहे. आम्ही भारतावर ५० टक्क्यांचा खूप मोठा टॅरिफ लादले आहे. पण तुम्हाला माहिती आहेच, माझे मोदींशी चांगले संबंध आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते, आम्ही रोज गार्डनमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली होती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *