गाडी चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे ? आरोग्य मंत्रालयाने दिला असा सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – दि. ४ सप्टेंबर – देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 39 लाखांच्या घरात पोहचला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेले 70 टक्के रुग्ण हे केवळ 5 राज्यांमधील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा समावेश आहे. मंत्रालयानुसार, प्रती 10 लाख लोकसंख्येमागे कोरोना संक्रमितांचा आकडा 2792 आहे.

कोरानातून बरे झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजबाबत मंत्रालयाने माहिती दिली की, याचा परिणाम 6 महिने ते एक वर्षापर्यंत राहण्याची शक्यता आहे. मास्क घालण्याबाबत देखील मंत्रालयाने माहिती दिली आहे. जर तुम्ही एकटे तुमची खाजगी कार अथवा वाहन चालवत असाल तर मास्क घालण्याची गरज नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. याबाबत कोणतीही गाईडलाईन जारी करण्यात आलेली नाही.

मात्र त्यासोबतच मंत्रालयाने सांगितले आहे की, जर तुमच्यासोबत गाडीत आणखी लोक असतील तर मास्क घालणे अनिवार्य आहे. इतरांसोबत जॉगिंग, सायकलिंग किंवा व्यायाम करत असाल तर त्यावेळेस देखील मास्कचा वापर करावा असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *