Pune Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदाही रेंगाळली : २४ तास पुर्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०७ सप्टेंबर | पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला २४ तास पुर्ण, मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजून ही सुरूच आहे, मिरवणुकीला काल सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाल्यानंतर आत्ताही मिरवणुका सुरूच आहेत.

मानाचा पहिला कसबा गणपती
-3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
-4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम-
4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
-4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.

-तर दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक सायंकाळी ४ वाजता सुरू झाली..विसर्जन ९ वाजून २३ मिनिटांनी म्हणजेच ५ तास २३ मिनिटांनी झाले.भाऊ रंगारी गणपती ३ वाजून २१ मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.

2024 साली पुण्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक 10 वाजता सुरु झाली होती. त्यावेळी विसर्जन किती वाजता झालं होतं?
मानाचा पहिला कसबा गणपती – 4:35 वाजता म्हणजे 6 तास 35 मिनिटं मिरवणूक चालली

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती – 5:10 वाजता म्हणजे 7 तास 10 मिनिटं मिरवणूक चालली.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती – 6:44 वाजता म्हणजे 8 तास 44 मिनिटं मिरवणूक चालली.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती – 7:15 वाजता म्हणजे 9 तास 15 मिनिटं मिरवणूक चालली.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती – 7:33 वाजता म्हणजे 9 तास 33 मिनिटं मिरवणूक चालली.

यंदा मिरवणूक 9:30 वाजता सुरु झाल्या आणि 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरुच
पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरुच. काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरु करुन विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरु केली आहे. पोलीस ही विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल मध्यरात्री नंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी , अखील मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *