महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांकडून विचित्र अनुभव येऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटिपित मन रमून जाईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका. आखलेल्या योजनांवर भर द्या.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. मुलांचा उत्साह वाढीस लागेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. खर्चाला आवर घाला.