महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
जोडीदारामुळे भाग्योदय होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )
स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.