देशाला आज मिळणार नवे उपराष्ट्रपती! NDA की INDIA, आकडे कोणाच्या बाजूने?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०९ सप्टेंबर | देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात आहे. संसदेत सकाळी 10 ते संध्याकाळी 5वाजेदरम्यान मतदान होईल. तर संध्याकाळी 6 वाजता नवा उपराष्ट्रपती कोण याचा फैसला होईल.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेत एनडीएचं संख्याबळ अधिक असलं तरी त्यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी दोन दिवस आधीच एनडीएकडून खासदारांना मतदानाचं प्रशिक्षण देण्यात आलंय. तसेच बीजू जनता दल आणि बीआरएसने मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने एनडीए उमेदवाराचं पारडं जड मानलं जातंय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपली मतं कशी वाढतील यासाठी रणनीती आखल्याचं दिसतंय.

NDAकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग केलं जाणार आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याने प्रत्येक खासदाराची गणना करूनच खासदार मतदानाला जाणार आहेत. यासाठी भाजपने ब्रेक फास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं नियोजन केलं आहे. यासाठी प्रत्येक मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत एकूण 782 खासदार मतदान करणार असून लोकसभेतील 543, राज्यसभेतील 233 आणि 12 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रामाणिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे केली जाते. खासदार गुप्त मतदानाद्वारे उमेदवारांच्या पसंतीच्या क्रमाने मत देतात आणि बहुमत गाठेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत सकाळी 10 वाजता मतदान करतील.

दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आज एकत्र मतदानासाठी जाणार आहेत. सकाळी 9 वाजता संविधान सभागृहातील आपच्या कार्यालयात खासदार उपस्थित राहतील. तिथून संसदीय दलाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली खासदार मतदानासाठी रवाना होतील. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज खासदार एकत्रितपणे मतदान करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *