महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर व्यापार चर्चा देखील बंद असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार हे भारताबद्दल वागद्रस्त विधाने करताना देखील दिसले. मात्र, परत डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारत भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत दोन्ही देशातील अनेक वर्षांची मजबूत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या व्यापार चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पुढच्या महिन्यातील नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अमेरिका दाैरा रद्द केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचेही थेट म्हटले होते.
आता याचदरम्यान भारताचे पुढचे अमेरिकी राजदूत सर्जिया गोर यांनी भारत आणि अमेरिकेतील टॅरिफच्या तणावाबद्दल मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत जास्त तणाव नक्कीच नाहीये. पुढच्या काही आठवड्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चा होईल आणि ज्याकाही समस्या आहेत, त्या दूर केल्या जातील. मात्र, यादरम्यान बोलताना गोर यांनी स्पष्ट सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे लागेल.
पुढे बोलताना गोर म्हणाले, ब्रिक्समधील विविध मुद्द्यावर भारताने आम्हाला साथ दिली आहे. भारत आणि अमेरिकेत रणनीती अत्यंत महत्वाची आहे. भारत आणि अमेरिका मिळून जगाची दिशा ठरवून शकते. आमच्यासमोर बरेच असे मुद्दे आहेत, ज्यामध्ये दोन्ही देशांना मिळून काम करायचे आहे. मात्र, गोर यांनी स्पष्ट सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर सातत्याने दबाव हा टाकला जातोय. मात्र, भारत हा रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवत असल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू आहे. भारताने स्पष्ट सांगितले की, आमची मर्जी आम्ही कुठूनही तेल खरेदी करू शकतो. तुम्हाला नसतील भारतीय वस्तू खरेदी तर नका कर. मागील काही वर्षांचे चांगलेच संबंध या टॅरिफवरून ताणल्याचे बघायला मिळतंय.