महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. विनाकारण धावपळ वाढेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
आपले मत योग्य प्रकारे पटवून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्यांना नाराज करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
अति विचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल. जोडीदाराच्या साथीने समोरील प्रश्न सोडवाल.