Maharashtra School Holiday: मुंबई, पुण्यातील शाळांना उद्याही सुट्टी जाहीर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | राज्यातील मुंबई आणि पुणेसारख्या शहरांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सप्टेंबरमध्ये मध्यम पाऊस पडेल असंही सांगण्यात आलं आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या, तर दुपारी भरणाऱ्या शाळांना आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली.

पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
पुढील 24 तासात रायगड व पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सातारा घाट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. NDRF आणि SDRF यांनी आपत्कालीन परस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

16 सप्टेंबरला शाळांना सुट्टी
मिळालेल्या माहितीनुसार, जर हवामानाची स्थिती अशीच राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता उद्या 16 सप्टेंबर रोजी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार पाऊस आणि वादळाच्या शक्यतेमुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि रत्नागिरी यासारख्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही.

बृहमुंबई महानगरपालिकेने अद्याप या भागातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही. पुढील सूचना आणि तपशीलांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळा व्यवस्थपनाशी संपर्क साधणं गरजेचं आहे.

पुण्यातही शाळांना 15 सप्टेंबरला सुट्टी
त्याचप्रमाणे, पुणे शहरातही रविवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पहाटे 4 वाजताच्या सुमारास आयएमडीने रेड अलर्ट जारी केला. रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शहरातील अनेक शाळांनी आज (15 सप्टेंबर 2025) सुट्टी जाहीर केली आहे. हडपसरमधील बहुतेक शाळा आज बंद होत्या. पुणे महानगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पाऊस सुरूच राहिल्याने शहरातील परिस्थिती पुढील काही तास अशीच राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *