महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्यांची मदत मिळेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )
विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.