महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ सप्टेंबर | कु. स्नेहल नामदेव कांबळे हिने महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागात ‘कनिष्ठ लेखापाल’ या पदावर अभिमानास्पद यश मिळवले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत तिने उत्तीर्ण होऊन आपल्या अथक परिश्रमांचे यश सिद्ध केले आहे.
स्नेहलच्या या यशाबद्दल माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, युवा नेते कमलेश वाळके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बापू माने, भारती बुद्ध महासभेचे विठ्ठल नगर शाखाध्यक्ष उत्तमराव जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते किशोर गवळी यांच्यासह मान्यवरांनी पुढील मुख्य परीक्षेसाठी तसेच भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्नेहलच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.