महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर | लवकरच एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची गरज राहणार नाही.केवळ स्मार्टफोनच्या मदतीने ग्राहकांना रोख रक्कम मिळू शकणार आहे. छोटे दुकानदार आणि व्यवसायिकांना खास QR कोड देण्यात येणार असून, त्या QR कोडला स्मार्टफोनमधून स्कॅन करून ग्राहकांना थेट ₹10,000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे.
या सुविधेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हि सुविधा सुरु झाल्यास ग्राहकांना पैसे काढण्यासाठी एटीएम शोधण्याची किंवा लांब रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही, फक्त मोबाइल आणि QR कोड स्कॅन करूनच सोप्या पद्धतीने रोख रक्कम मिळू शकेल.