महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधी मिळेल. नवीन ओळख होईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope )
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.