महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांच्या पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.या योजनेबाबत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाखांपेक्षा जास्त महिलांना अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, यामध्े तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करु शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातून २६ लाख महिला बाद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात आली आहे. यातून अनेक राज्यातून महिला अपात्र ठरल्या आहेत. मराठवाड्यातून तब्बल सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात दोन टप्प्यांमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी गावागावात जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांना बाद करण्यात आले. त्यामध्ये ४०२२८ अर्ज अपात्र ठरले.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात महिलांचे पडताळणी करण्यात आले. यामध्ये एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेले असेल तर त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. यामधून ८४७०९ अर्ज अपात्र ठरले. या दोन्ही टप्प्यांमध्ये १२४९३७ महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.
या जिल्ह्यातील महिला अपात्र
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात करण्यात आली आहे.
तुमचं नाव यादीत आहे का? असं करा चेक
तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क करुन चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जावे. यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती चेक करु शकतात.