अक्षय कुमारने केली मेड इन इंडिया ‘FAU:G’ गेमची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ सप्टेंबर – पुणे – भारत सरकारने चीनवर पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करत 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. या अ‍ॅप्समध्ये लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप पबजीचा देखील समावेश आहे. मात्र आता पबजीवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या गेमला भारतीय पर्याय आणण्याची तयारी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केली आहे.

अक्षयने गेमर्सला आनंदाची बातमी दिली असून, पबजीला पर्याय म्हणून त्याने FAU:G (Fearless and United: Guards (FAU:G) अ‍ॅक्शन गेम लाँच करणार असल्याचे सांगितले आहे.


फौजी नावाचे हे अ‍ॅप अक्षय कुमारच्या मेंटरशिपमध्ये बनले. ही एक मल्टीप्लेयर अ‍ॅक्शन गेम असेल. पबजीला टक्कर देणारे हे अ‍ॅप पुर्णपणे भारतीय असेल व याच्या कमाईतील 20 टक्के रक्कम भारत के वीर या ट्रस्टला दिली जाईल.

अक्षय कुमारने या अ‍ॅपबाबत माहिती देताना सांगितले की, युवकांसाठी गेमिंग त्यांच्या एंटरटेनमेंटचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. या गेमद्वारे एंटरटेनमेंटसोबतच युवकांना आपल्या देशाच्या जवानांच्या बलिदानाबाबत देखील माहिती मिळेल. ही गेम पुढील महिन्यात लाँच करण्याची तयारी आहे. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर ही गेम उपलब्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *