कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोनाची लस ? डब्ल्यूएचओने दिले उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ सप्टेंबर – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. प्रत्येकजण ही लस कधी बाजारात येईल याची वाट पाहत आहे. जेणेकरून, पुन्हा एकदा आधीसारखे न घाबरता आयुष्य जगता येईल. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनुसार लसीसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जगभरात कोरोना प्रतिबंधक लस 2021 च्या मध्यच्या आधी येण्याची शक्यता कमी आहे. सोबतच त्यांनी चाचणी आणि सुरक्षेवर जोर दिला. संघटनेचे प्रवक्त्या मार्ग्रेट हॅरिस म्हणाल्या की, पुढील वर्षी मध्यापर्यंत जगभरात व्यापक स्वरूपात कोव्हिड-19 लस येण्याची शक्यता कमी आहे. तिसरा टप्पा दीर्घकाळ चालेल. आपल्याला हे पाहणे गरजेची आहे की हे वास्तविक किती सुरक्षित आहे.

दरम्यान जगभरात कोरोना लसीच्या वाटप योजनेत डब्ल्यूएचओच्या नेतृत्वाखाली जवळपास 76 देश सहभागी झाले आहेत. हे सर्व देश कोरोना लस खरेदी करण्यास तयार झाले आहेत. या योजनेला कोवॅक्स नाव देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *