Pune Crime : पुन्हा एकदा पुणे हादरलं ! कोथरूडमध्ये मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ सप्टेंबर | गोळीबारीच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. कोथरूडमध्ये मध्यरात्री निलेश घायवाळ याच्या टोळीतील ५ जणांनी फायरिंग केल्याचे समोर आलेय. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोथरूडमधील घटनेची पोलिसांकडून दखल घेतली असून तपास वेगात सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यामध्ये सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आयुष कोमकर प्रकरण ताजे असतानाच आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. (Nilesh Ghaywal gang firing in Pune details)

पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव प्रकाश धुमाळ असे आहे. निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडून गोळीबार करण्यात आला. मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे अशी अरोपींची नावे आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास वेगात सुरू केला आहे. गोळीबार का झाला? यामागील कारण काय होतं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर येताच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या मानेला आणि मांडीला गोळी लागल्याची माहिती मिळत असून यावेळी तीन राउंड फायर करण्यात आल्या आहेत. कोथरूडच्या शिंदे चाळ जवळ ही फायरिंगची घटना घडली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवाळ गँगच्या पाचही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *