महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० सप्टेंबर | राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानखात्याच्या अंदाजानुसार नवरात्रोत्सवादरम्यानही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईमध्ये हलक्या सरी कोसळू शकतात, मात्र त्यानंतरच्या मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्याता असून, शेतकरी तसेच नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये पिकांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, अजूनही काही भागांमध्ये शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकं सडली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेला आहे.