महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची संधी; एसटी महामंडळात 17 हजार पदांसाठी भरती, इतका मिळणार पगार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ सप्टेंबर | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच 17 हजार 450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळात एसटी महामंडळ 8 हजार नवीन बस खरेदी करणार आहे. या बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळं ही भरती करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळात होणाऱ्या भरतीसाठी 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची अलीकडेच बैठक पार पडली. त्यावेळी बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निवेदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

बसची संख्या वाढवल्यानंतर त्यासाठी हवे असलेले मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य असणार आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

किती मिळणार पगार?
भरतीची ही प्रक्रिया 6 प्रादेशिक विभागनिहाय राबवण्यात येणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. या कर्मचाऱ्यांना 30 हजार इतके किमान वेतन देण्यात येणार असून एसटीकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

विशेष गाड्यांमधून 23 कोटींचा महसूल
गणेशोत्सवात कोकणवासीयांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष एसटी गाड्या चालवल्या. उत्सवकालावधीतील धावलेल्या विशेष बसगाड्यांमधून पाच लाख 96 हजारांपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीच्या सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. उत्सव विशेष वाहतुकीतून महामंडळाला 23 कोटी 77 लाख रुपयांचा महसूल मिळाला. गणेशोत्सवासाठी एसटीद्वारे नकोकणवासीयांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून पाच हजारांपेक्षा जास्त एसटी बसगाड्या आल्या. विशेष बसगाड्यांमधून 15 हजार 388 फेऱ्यांतून पाच लाख 96 हजार 5 प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *