e-Aadhaar App: सरकार लाँच करणार नवीन अ‍ॅप : आता घरबसल्या काही मिनिटांत करता येणार आधार अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला आधार कार्डमधील काही माहिती बदलायची असेल तर ते अपडेट करावे लागेल. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमचा पत्तादेखील बदलू शकतात. काही कामे तुम्ही ऑनलाइन करु शकतात. काही कामांसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. मात्र, आता ही सर्व कामे सोपी होणार आहेत. तुम्ही घरबसल्या आधार अपडेट करु शकणार आहात.

सरकार आता आधार युजर्ससाठी मोबाईल अॅप तयार करत आहेत. तुम्ही -e-Aadhaar अॅपवरुन सर्वकाही अपडेट करु शकतात. हा अॅप डेव्हलप करण्याची जबाबादरी UIDAI कडे आहे. हा आधार अॅप डाउनलोड झाला की अनेक कामे सोपी होणार आहेत.

e-Aadhaar काय आहे ?
ई आधार अॅपवरुन तुम्ही घरबसल्या अनेक कामे करु शकतात. तुम्ही घरबसल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर ही माहिती बदलू शकतात.यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आधार सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही.तुम्हाला एआय आणि फेस आयडी टेक्नोलॉजीचा वापर करुन आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

बायोमॅट्रिक अपडेट प्रोसेस
आधार कार्डधारकांना बायोमॅट्रिक प्रोसेस करण्यासाठी आधार सेंटरमध्ये जावे लागेल. यूआयडीएआय अपडेट प्रोसेस अधिक सोपी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तुमचे काम कमी होणार आहे. यामुळे पुढे कधीही अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

कधी लाँच होणार अॅप
आधार कार्डचे हे नवीन अॅप अजूनपर्यंत पूर्णपणे तयार नाही आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या वर्षी अखेरपर्यंत आधार अॅप लाँच करण्याची सरकारची तयारी आहे. या अॅपमध्ये फ्रेंडली डिजिटल इंटरफेस असणार आहे. यामुळे ग्राहकांचे काम खूप सोपे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *