महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम उज्जवला योजना. या योजनेत महिलांना फ्री एलपीजी गॅस कनेक्शन मिळते. आता सरकार या योजनेचा विस्तार करत आहेत. या योजनेत २५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.
महिला सशक्तीकरणासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने २०२५-२६ आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्जवला योजनेत २५ लाख कनेक्शन जारी करण्याची मंजुरी दिली. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २५ लाख नवीन एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहेत.
प्रत्येक कनेक्शनसाठी २,०५० रुपये करणार खर्च
हरदीप सिंह रुरी यांनी सांगितले की, प्रत्येक कनेक्शनसाठी सरकारी २०५० रुपये खर्च करणार आहे. यामध्ये महिलांना एलपीजी गॅससोबत शेगडी आणि रेग्युलेटर फ्रीमध्ये मिळणार आहे. यामुळे लाखो महिलांना फायदा होणार आहे. या योजनेत आजापर्यंत कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर आता आणखी २५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे.
वर्षाला मिळणार ३ मोफत सिलेंडर
पीएम उज्जवला योजनेत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. गावाखेड्यातील महिलांना चुलीवर जेवण बनवताना त्रास होतो. हाच त्रास कमी व्हावा, यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उज्जवला योजनेत एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या कुटुंबात महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.