महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ऑनलाइन प्रोसेस सुरु केली आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी होणार आहे. जर केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावर आता उपाय काढण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अडचणी
लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन पोर्टलवर जाऊन ई केवायसी करावी लागते. दरम्यान, ई केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ओटीपीदेखील येत नाही. त्याचसोबत साइटवर लोड येत असल्याने केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहे. यावर आता एक उपाय समोर आला आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी एकाचवेळी केवायसीसाठी लॉग इन करायला गेली. त्यामुळे साइटवर लोड आला. यामुळे एकाचवेळी अनेक महिलांना केवायसी करण्यात येत नाही. त्यामुळे यावर एक उपाय शोधून काढण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांनी केवायसी करताना घाई करायची नाही. त्यांनी अचून माहिती भरायची आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नियमांचे पालन करुन केवायसी करा.
उपाय काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ई केवायसी करताना अनेक लाभार्थी एकाचवेळी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे साइटवर लोड येतो. अशावेळी रात्री १२नंतर किंवा पहाटे ४ ते५ वाजताच्या दरम्यान ई केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात तुमची केवायसी प्रोसेस जलद होऊ शकते.