महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पीएफ काढण्याच्या नियमात बदल केले जाणार आहे. आता पीएफ काढणे अजून सोपे होणार आहे. आता कर्मचाऱ्यांना सध्याच्या लिमिटपेक्षा जास्त पीएफ काढता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईपीएफओ सदस्यांना घर खरेदी करण्याची, लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी जास्त पैसे काढता येणार आहे. ईपीएफओ पुढच्या एका वर्षात हा नियम लागू करणार आहे. यामुळे पीएफ काढण्याचे नियम आणखी सोपे करण्याचे प्रयत्न आहेत.
सरकार पीएफ काढण्याच्या नियमात करणात बदल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता पीएफ काढण्यासाठी कोणताही निर्बंध लावण्यात येणार नाही. हे कर्मचाऱ्यांचे पैसे आहेत. हे पैसे कसे वापरायचे यासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, असं त्यांनी सांगितले. दरम्यान, आता या नियमांत बदल केला जाणार आहे.
पैसे काढण्यासाठी आहेत अटी
आता ईपीएफओ कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असल्यावर पूर्ण पीएफ काढू शकत होते. यामुळे तुम्हाला सध्या फक्त काही ठरावीक रक्कम काढण्याची परवानगी आहे. दरम्यान,आता या नियमांत बदल केले जाणार आहे. यामुळे तुम्हाला पैसे काढण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
७ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा
सरकारने ईपीएफओ कर्मचाऱ्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफओ कर्मचारी पीएफ अकाउंटमध्ये जमा रक्कमेपैकी एक हिस्सा १० वर्षात काढू शकतात. या नियमामुळे ७ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढता येणार आहेत.