जन्मभूमी इतकाच अभिमान कर्मभूमीचा ही बाळगावा :

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पुणे -दि. ६ सप्टेंबर-  पोटा पाण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची वेळ कुणावरही येवू शकते. काहींना ईच्छा नसतानाही नाईलाजाने जन्मगाव सोडावं लागतं तर कुणी आपल्य आर्थिक,सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी जन्मगाव सोडतात…..(या पूढे लेखात जन्मगाव म्हणजे जन्मभूमी आणी् जीथे तूम्ही स्थाईक होतात त्याला कर्मभूमी म्हणू या.) …ज्या वेळी आपण जन्म भूमी सोडतो तेव्हा घरच्यांच्या डोळ्यात काय अपेक्षा असतात व मनात काय भावना असतात हे सर्वच जन्म भूमी सोडणारयांना माहीत आहे.त्याच प्रमाणे आपण ज्या भूमीत आपण आपले भविष्य अजमायला जातो साहजिकच तेथील स्थानिक भुमीपूत्रांच्या आपल्या कडूनं काय अपेक्षा असणार हे ही आपण ओळखून असतो.

सुरूवातीला काही वर्ष आपण राहतोही त्या प्रमाणेच. कर्मभूमीत आपल्या कमाईचा पहीलाच पगार मिळाल्यावर व गावी पहीलीच मनी ऑर्डर पाठवतांना आपल्याला जो अभिमान वाटतो तोच अभिमान शेवट पर्यंत आपल्या मनात राहीला पाहिजे……..तसेच ज्यावेळी पहील्यांदाच आपण कर्मभूमी त प्रवेश करतो त्या वेळीच्या आपल्या भावना काय असतांत, सुरूवातीला आपल्या असलेल्या अपेक्षा पूर्ती होण्यासाठी आपण कसे राहतो किती नम्रतेने राहतो….. स्थानिकांकडून आपल्या काय अपेक्षा असतांत. त्या शहराकडे व तेथील भुमीपूत्रांकडे व तेथील रूढी परंपरा कडे बघण्याचा दृष्टीकोन आपला जसा असतो तो शेवट पर्यंत तसाच राहिला पाहिजे. ……..परंतु प्रत्यक्षात सर्वांकडून तसे होत नाही. काही महामाग मागचे दिवस विसरतात कारण त्यांनी आपल बस्तान बसवलेले असते. घर दार गाडी घोडी झाले ली असते, दोन पैसे हातात असतात. हे सर्व त्याचे कष्टाचे च असते पण स्वभावात बदल, नम्रपणे च्या जागी उर्मटपणा , खिशात सतत असतो आणा म्हणून जणू काही मीच शहाना अस वाटायला लागते. प्रत्यक्षात तस काहीच नसतं. आपल्या पेक्षा लई लोक मोठी आहेत, आपण त्यांच्या मानाने काहीच नाहीत याचे भान ते विसरतात…………………..आणि येथुनच कर्मभुमी चे दोष त्यांना दिसायला लागतात.

जन्मभूमी चा पुळका जरा जास्तच यायला लागतो.गावाकडे काय चांगले आहे याचा अहंकार त्याच्या बोलण्यातून जाणवायला लागतो. कर्मभूमी त मी केले म्हणून झाले कोणी काही फुकटात नाही दिले. घराचा सात बारा झाला तर मी इथला मालक झालो असही वाटायला लागतं आणि तिथून च हे शहर काय कोणाच्या बापाच आहे का? असंही उघडपणे अंहंभावनेणे बोलायला सुरुवात होते……..थोडक्यात कर्मभूमीची किंमत कमी वाटायला लागते. तिच्या त दोष दिसायला लागला., काही किरकोळ प्रमाणात दोष असतीलही शेवटी शहर खुप मोठमोठी असतात. लाखो लोक बाहेरुन आपले करिअर घडवायला आलेली असतात.त्यात काहींना अकले पेक्षा जास्त पैसा मिळत असतो तर काही गैर मार्गाने पैसा कमवून मोठे झालेले असतात अशी मंडळी शहर खराब करीत असते , त्यात बाहेरच्यां प्रमाणे स्थानीक मंडळी ची ही भर पडते कारण त्यांच्या कडेही अपेक्षा पेक्षा जास्त पैसा आलेला असतो.(सर्वच असे असतात असे नाही. खुपच थोडे अशी असतात.)……

.अशा मंडळी मुळे शहरात चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी ही काही प्रमाणात घडत असतात. ज्या मुळे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. अशा दोषी घटनांमध्ये आपला काही च सहभाग नसतो.. परंतु काही च सहभाग नसला तरी आपल्या कर्मभुमी चा अभिमान म्हणून अशा वाईट गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न न करता इतरांना जबाबदार धरून आपण आपली त्यातून सुटका करू पाहतोय……….. सध्या जे काही चाललय ते असच चाललय……परंतु आपणही काही ना काही त्यात सुधारणा करू शकतो अशी भावना आपण ठेवली व त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करत राहीलो तर जन्मभूमी इतकाच अभिमान कर्मभूमीचा ही वाटेल यात तीळ मात्र शंका नाही…….कारण जन्मभूमी बोट धरून चालयला शिकवते तर कर्मभूमी धावायला शिकवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *