डॉक्टर व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने पिंपरी चिंचवड चे नागरीक त्रस्त ; अलोक गायकवाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे तक्रार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ सप्टेंबर – पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर के . एस. बी चौक येथील कोविड सेंटर बी . एस . एन .एल ऑफिस येथील कोविड चेकअप सेंटर दररोज १५० ते २०० नागरीक येत असतात . तसेच पिंपरी चिंचवड आरोग्य विभाग यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे या सेंटर मध्ये वापरलेले मास्क आजूबाजूला पडलेले आहेत . तसेच तेथील सांडपाणी व सांडपाण्यामुळे डेंगू चे मच्छर तिथे येणाऱ्या लोकांनां चावतात व त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले हि असतात. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना या गोष्टीचा नाहक त्रास होत आहे .

तसेच तेथील डॉक्टर व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे कविड रॅपीट टेस्ट रिपोर्ट ८ दिवस येत नाही . यामुळे कोरोनाचा प्रसार झपाटाने होत आहे पेशंट वाढत आहेत पिंपरी चिंचवड मधील सर्व (अ , ब ,क , ड ,ई ) प्रभागातील अधिकरी नागरिकांना व पेशेंटच्या नातेवाईकांना नागरिकांचा हाती रिपोर्ट नसतानाही फोन करून त्रास देतात . तरी आपण वैयक्तिक दखल घ्यावी. अशी विनंती अलोक गायकवाड यांनी अजित पवारांना केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *