महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल. दरम्यान, या योजनेत ई केवायसी करण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्ही या कालावधीत केवायसी केली नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते. या योजनेच्या केवायसीबाबत आता अजित पवारांनी महत्त्वीची प्रतिक्रिया केली आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य का केली?याबाबत अजित पवारांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी आता चार-पाच जिल्ह्यांचा दौरा केला आहे. तेव्हा मी लाडक्या बहिणींना विचारले तेव्हा अनेक महिलांनी केवायसी केली आहे. कुठेतरी हा पैसा सरकारचा, जनतेल आहे. हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. ज्या खरंच लाभार्थी आहे त्यांच्याच खात्यात पैसे जावे, म्हणून या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. आता काही जण मयत असतात, पण त्यांची नावं कमी केलेली नसतात, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे ई केवायसी केलेली आहे. देशात सगळीकडेच ई केवायसी सुरु आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागृती झालेली आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे.
ई केवायसी कशी करावी? (Ladki Bahin Yojana E KYC Process)
तुम्हाला सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यामध्ये तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यामध्ये तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला याचा समावेश आहे.
यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्याआधी कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.