महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत सोन्याची किंमत १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 19 हजारांवर गेला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 400 रुपयापर्यंत वाढला आहे. आगामी काळातही सोने-चांदीचा भाव असाच वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अवघ्या काही दिवसांवर दसरा असून दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.