महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ ऑक्टोबर | म्हाडाच्या घरासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आता म्हाडाचे घर तुम्हाला लगेचच विकता येणार आहे. याआधी घर खरेदी केल्यापासून ५ वर्षे घर न विकण्याची अट होती. आता ही अट लवकरच काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तर म्हाडाचे घर खरेदी केल्यापासून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकता येणार आहे.