महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने आता बेसिग सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता १ ऑक्टोबरपासून या अकाउंटधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु होणार आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घोषणा केली आहेत.
आता बीएसबीडीए अकाउंटधारकांना याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत फक्त डिजिटल आणि ऑनलाइन बँकिंगा सेवा फक्त बचत खात्यांसाठी उपलब्ध होता. त्यानंतर आता बेसिक सेव्हिंग अकाउंटधारकांनाही डिजिटल बँकिंगचा वापर करता येणार आहे. यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.
संजय मल्होत्रा काय म्हणाले?
संजय मल्होत्रा यांनी चलन धोरण जाहीर करताना सांगितले की, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंवर डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे अनेकांना घरबसल्या बँकिंग सुविधांचा फायदा घेता येणार आहे. सध्या बीएसबीडीवर एफडी आणि पैसे काढण्याची सुविधा आहे. तसेच एटीएमदेखील होते. मात्र, या खात्यासाठी डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध नव्हत्या.
कोट्यवधी खातेधारकांना होणार फायदा
लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला बँकिंग सुविधेचा लाभ देण्यासाठी आरबीआयने बीएसबीजी खाते उघडण्यास परवानगी दिली होती. याद्वारे मुलभूत बँकिंग सेवा दिली जाते. ग्राहकांना काही सुविधा मोफत मिळतात. या खात्यात तुम्हाला कोणतीही रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, आता या डिजिटल सेवांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे.