महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मात्र सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आज दसरा आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. आज सोन खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात झुंबड उडाली असेल. आज ग्राहकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. कारण सोन्याचे दर किंचितसे स्वस्त झाले आहेत. मात्र असे असले तरी भाव लाखांच्याच वर आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 1,18,690 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली असून 1,08,800 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची घसरण झाली असून 89,020 रुपयांवर स्थिरावले आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,08,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,18,690रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 88,020 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,880 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,869 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,902 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 87, 040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 94, 952 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 71, 216 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18,690 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,08,800रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 88,020 रुपये