महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ सप्टेंबर – पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने देण्यात येणारा पिंपरी चिंचवड युवा प्रेरणा पुरस्कार -२०२० (Pimpri Chinchwad Young inspiration -2020 ) ह्यावर्षी राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक, लेखक सुजय सुनिल डहाके यांना देण्यात येणार आहे.हा पुरस्कार प्रसिध्द छायाचित्रकार मा.सुधारक ओलवे सरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे , अशी माहीती पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे संचालक मा. अविनाश कांबीकर आणी दत्ता गुंड यांनी दिली.
आपल्या कारकिर्दीच्या पदार्पणातच ‘शाळा’सारखा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट देणारे तरुण चित्रपट दिग्दर्शक सुजय सुनिल डहाके हे आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असून सुजयचे बालपण आणी शिक्षण या शहरातच झाले आहे. या क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींसाठी ते प्रेरणादायी तरुण व्यक्तिमत्व आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके हे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन दृश्यात्मक कथांसाठी प्रसिध्द आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याने आजपर्यंत हाताळले असून त्यांच्या चित्रपटांमध्ये शाळा, आजोबा आणि फुंतरू , केसरी यांचा समावेश आहे. तसेच सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ नावाची डिजीटल वेब सिरीजचे ही दिग्दर्शन सुजय यांनी केले होते.मागील वर्षी गोव्याला पार पडलेल्या इफ्फी मध्ये त्यांच्या ‘च्या आयला ‘ ह्या त्यांच्या चित्रपटाचा सहभाग होता तसेच त्यांना पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल मध्ये ही विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
मागील वर्षी हा पुरस्कार पिंपरी चिंचवड मधील प्रसिध्द छायाचित्रकार दिग्दर्शक मा. अविनाश अरुण यांना देण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड फिल्म क्लब आयोजित दुसरा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून मागील ३ दिवसात या आॅनलाईन महोत्सवास प्रेक्षकांचा प्रचंड सहभाग मिळाला. आज सांयकाळी ७ वाजता विजेत्यांची नावे जाहिर करण्यात येणार आहेत. या महोत्सवासाठी दिग्दर्शक मा. रमेश होलबोले , हर्षवर्धन धतुरे यांनी विशेष कामगिरी केली.