महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – दि. ६ सप्टेंबर – जिल्यातील कोरोना व्हायरसच्या शिरकाव्यामुळे महाराष्ट्र सरकार व आरोग्य विभागामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण यांनी वेळोवेळी उपाय योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला असूनही. त्याअनुषंगाने जिल्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांनी जिल्यातील अचानक भेटीदेत कोरोना विषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊनही व अंबाजोगाई येथून कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना बदली करून आणल्या वर ही कोविड सेंटर मधील रुग्नांची हेळसांड थांबता थांबत नाही.नांदेड जिल्ह्याला ला मा.ना.अशोकरावजी चव्हाण नी कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या टीम नी उत्तम सजवले आहे.असे असून न ही सर्वच उपाय योजना कुचकामी ठरत आहेत.
वशिले बाजी शिवाय बेड मिळत नाहीत. काल विष्णुपुरी येथील ड्रा.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हिवरा येथील 45 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सकाळी 7 वाजता हा रुग्ण दवाखान्यात दाखल झाला होता. पण कोरोना च्या धास्तीने एकही ड्राक्टर त्याच्या कडे तपासणी साठी फिरकले नसल्यामुळे दुपारी एक ते दीड च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही बाब रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री मा. ना.राजेशजी टोपे यांना घडलेला प्रकार फोन करून सांगितला आहे. खाजगी रुग्णालयाची तर गोष्टच वेगळी आहे नांदेड शहरातील 9 खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर चालू करण्यात आली आहेत या ठिकाणी तर वशिले लावल्या शिवाय बेडच मिळत नाहीत. महाराष्ट्र शासनाने खाजगी रुग्णालयांना 80/टक्के बेड राखीव ठेऊन 20 टक्के खाट्टा वर रुग्णांना उपचार करीत असताना ते नेहमी प्रमाणे बिल आकारणी करू शकतात याचाच फायदा घेऊन आलेल्या रुग्णांना त्याच 20 टक्के मध्ये उपचार होत असल्याचे भासहुन अमाप बिल वसुली केली जात आहेत .
नांदेड महानगर पालिकेंने चालू केलेल्या नाना नाणी पार्क येथील तपासणी केंद्रातील बाधित रुग्णांना स्वतःचं रुग्णालय गाठून उपचार घ्यावे लागत असून बाधित नसलेल्या रुग्णांना कोरोना बाधित नसल्याचे प्रमाणपत्र मिळ्वण्यासाठी दोन दिवसांनी येऊन घेऊन जाण्याचा सल्ला मनपा कर्मचाऱ्यांनं कडून देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील पंजाब भवन व N R I यात्री निवास अस्वच्छते विषयी मनपा आयुक्तांना पत्राद्वारे कळून धार्मिक स्थळाची विटंबना थांबवण्याची विनंती केली होती.शहरातील कुठल्याच कोविड सेंटर मध्ये रुग्णांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचा विचार केला जात नसल्याचे त्या कोविड सेंटर मध्ये राहून कोरोना वर मात करून आलेल्यांनी कोविड सेंटरच्या कडू आठवणी सांगितल्या आहेत यात रुग्णांना दिले जाणाऱ्या दर्जाहीन जेवण असुद्या कि त्यांना लागणाऱ्या पाणी नसलेले बाथरूम, नास्ता, रुग्ण राहत असलेली अस्वच्छ खोली विदारक दृश्य या मुळे रोज मरणाच्या छायेत असलेल्या कोविड रुग्णांची हेळसांड होत आहे.
आयुर्वेदिक कॉलेज मध्ये असलेल्या कोविड सेंटर ची तर बातच वेगळी आहे या परिसरात कोविड रुग्णापासून बचावा साठी वापरण्यात आलेल्या हॅडग्लोज, मास्क, रुग्णांनी वापरलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वापरलेले वैद्यकीय साहित्य गेट जवळच पडून असून कोविड सेंटर मधील बाथरूम मध्ये पाणीच नाही तर दिवसभर लाईट गायबच असते त्यामुळे फॅन बंद असल्यामुळे रुग्णांचा जीव गुदमरत असल्याचे काही रुग्णांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहेत.रुग्णालयातील या बाबीकडे मा.आ.मोहनअण्णा हंबर्डे यांच्या कडे प्रतिनिधी मार्फत कोविड सेंटरच्या समस्या मांडण्यात आल्या असून त्यांनी लवकरच संबधीत अधिकाऱ्यांना कोविड रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीचे जॉब विचारून पुढील सूचना उपाय योजना केल्या असल्याचे सांगितले आहे. एका आरोग्य सेवकाने तर कोविड विषयी आमच्या प्रतिनिधीशी फारच विदारक अशी गोष्ट सांगितली आहे. जिल्ह्यातील शल्य चिकित्साक श्री.ड्रा.नीलकंठ भोसीकर यांना पत्रकारांना कोणत्या कोविड सेंटर मध्ये किती बेड आरक्षित आहेत याची माहितीच नाही.व्हेंटिलेटर बहुतांश कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजन ची कमतरता असल्याचे आढळून आले आहे.