महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ६ सप्टेंबर – कोरोना उपचाराबाबत राज्य सरकारने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायझर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅंड) पद्धतीने जगावे लागेल. ‘एसएमएस’ पद्धतीचा वापर करून कार्य करावे आणि जेवढे टाळता येऊ शकत असेल, त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात.
राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. त्यामध्ये १००० रुग्णालये आहेत. ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचे एकच लक्ष्य राहिले आहे, की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यांसमोर आहे, त्या दृष्टिकोनातून धोरणे आखली आहेत.
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री