दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत वाढू शकते ‘इतकी’ ; गुंतवणूक करण्यापूर्वी हे एकदा वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ६ सप्टेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे प्रतितोळा दर साऱ्यांचं लक्ष वेधत आहेत. कधी विक्रमी उंची गाठणाऱ्या या दरांमध्ये एकाएकी मोठ्या फरकानं घसरण येत आहे. दिवाळीपर्यंत Gold Rates सोन्याचे दर प्रति तोळा ६० हजारांच्या घरात जाण्याशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नेमकं सोनं खरेदी करावं तरी कधी, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. सर्वसामान्यांनासुद्धा सोन्याचे दर पाहता या धातूमध्ये नेमकी कधी आणि किती गुंतवणूक करावी याबाबत असंख्य प्रश्न पडत आहेत.

सहसा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पेपर गोल्ड, गोल्ड ETF, सॉवरेन गोल्ड बॉण्ड, गोल्ड म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्ड यांचा समावेश आहे. कोरोनाकाळात याकडे एक चांगला पर्याय म्हणूनही पाहलं जात आहे. कारण, दरम्यानच्या काळात या पर्यायांचा वापर करुन गुंतवणुकदारांकडे खरेदी आणि विक्रीचा अगदी सोपा पर्याय उपलब्ध आहे. त्यातचं सोनंही शुद्ध असतं शिवाय त्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता करण्याची आवश्यकता नसते.

सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी याचा वापर ‘असेट’ म्हणूनही केला जाऊ शकतो. सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यामध्ये शुद्धता, त्यांची काळजी या साख्या गोष्टी ओघाओघानं आल्याचं. अशा वेळी डिजिटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय सोयीचा.

सध्या आर्थिक व्यवहारांमध्ये गोल्ड म्युच्युअल फंडचीही चर्चा आहे. ज्यामध्ये सोन्यामध्ये पैसे गुंतवले जातात. यामध्ये फंड व्यवस्थापक अर्थात फंड मॅनेजर गुंतवणुकदारांच्या रकमेची काळजी घेतात. शेअर बाजारातील परिस्थितीचा परताव्यावर परिणाम होतो. सर्व नियम, अटी आणि बाजाराची परिस्थिती याचा अंदाज घेऊन यामध्ये स्वबळावर गुंतवणूक करता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *