महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | कोथरूड | दसर्याच्या शुभ मुहूर्तावर पुण्यातील सुप्रसिद्ध एस. एस. नगरकर ज्वेलर्स या ७२ वर्षांच्या परंपरेचा वारसा जपणाऱ्या दागिन्यांच्या ब्रँडने आपल्या नव्या भव्य दालनाचं कोथरूड येथे उद्घाटन करत नवा सोनेरी अध्याय सुरू केला आहे.
कोथरूडच्या करिष्मा सोसायटीजवळील या शोरूमचे उद्घाटन कोणत्याही बड्या सेलिब्रिटीच्या हस्ते न होता जुन्या निष्ठावान ग्राहकांच्या हस्तेच करण्यात आले. “आमचा ग्राहक हाच आमचा सर्वात मोठा सेलिब्रिटी आहे,” हा भावनिक आणि अर्थपूर्ण संदेश नगरकर परिवाराने कृतीतून दिला.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. कोथरूडकरांनी दसर्याच्या शुभ प्रसंगी नगरकरांच्या नव्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कलेक्शनमधील वैविध्य, डिझाईनची श्रीमंती आणि आकर्षक ऑफरमुळे खरेदीदारांना चांगलाच फायदा मिळत आहे.
💬
“आमच्यासाठी ग्राहक म्हणजे केवळ खरेदीदार नव्हे, तर आमच्या ७२ वर्षांच्या प्रवासातील कुटुंबीय आहेत.
आमचा प्रत्येक ग्राहक आमच्या वाढीचा आणि विश्वासाचा भाग आहे. त्यामुळे या नव्या दालनाचं उद्घाटन आमच्या ग्राहकांच्या हस्ते करणं हे आमच्यासाठी अभिमानाचं क्षण आहे. दर्जा, डिझाईन आणि पारदर्शक व्यवहार ही आमची तीन तत्त्वं कायम राहतील — कारण आमचं सोनं केवळ धातूचं नाही, तर नात्यांचं आहे!”
प्रसाद नगरकर. एस एस नगरकर ज्वेलर्स
🏬 एस. एस. नगरकरच्या शाखा:
१️⃣ तुळशीबाग
२️⃣ गणपती चौक – लक्ष्मी रोड
३️⃣ ठाणे – राम मारुती रोड
४️⃣ कोथरूड – करिष्मा सोसायटी
सर्व शाखांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विश्वास आणि परंपरेच्या या सुवर्णयात्रेला कोथरूडकरांचा मनापासून प्रतिसाद लाभत आहे.