महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. अस असताना पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडन येथे पसार झाला असून त्याला यासाठी पासपोर्ट कसा मिळाला तसेच त्याला राजकीय वरदहस्त मिळाला का की पोलिस दलांतूनच मदत झाली याबाबत आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता निलेश घायवळ प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणी शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या कॉल डिटेल्स तपासावे यात घायवळ आणि तो किती वेळा बोलले आणि दादांना किती वेळा निरोप देण्यात आले याची माहिती मिळेल असा आरोप यावेळी धंगेकर यांनी केलं आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने एका रिक्षाचालकाला धडक दिली असून तो रिक्षाचालक गंभीर जखमी असून या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली यावेळी त्यांना कुर्ख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी विचारलं असता त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलं.
यावेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या कॉल डिटेल्स तपासावे यात घायवळ आणि तो किती वेळा बोलले आणि दादांना किती वेळा निरोप देण्यात आले याची माहिती मिळेल पण पोलीस काही करत नाही.पोलिसांनी आज जर ठरवलं तर घायवळ निस्तनबुत होईल पण पोलिसांवर ज्यांचं अंकुश आहे त्यांची ही पिलावळ असल्याने त्यांचा तपास व्हायला पाहिजे अस यावेळी ते म्हणाले.