महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झाली. यासोबतच अमेरिकेकडून भारतावर गंभीर आरोप केली जात आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि चीन तज्ज्ञ श्रीकांत कोंडापल्ली यांनी नुकताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहंकारामुळे भारतीय आयातीवर शुल्क लादले असावे, असे म्हटले आहे. ट्रम्प यांना व्यापारावर शुल्क आकारायचे असेल तर त्यांनी भारतावर नाही तर चीनवर लादले असते.
मुळात म्हणजे यामध्ये भारताचा काहीच संबंध नाहीये. डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांती पुरस्कार मिळवण्यासाठी दावा करत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील मोठे युद्ध मीच थांबवल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, भारत-पाक युद्धात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि मग हे युद्ध थांबले. भारत-पाकिस्तान युद्धाचे श्रेय घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी दावा केला.
हेच नाही तर जगातील मोठी सात युद्ध मी थांबवल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला असल्याने त्यांनी वैयक्तिक अहंकारातून भारतावर टॅरिफ लावल्याचा आरोप करण्यात आला. इस्त्रायल हमास युद्धात देखील ते नोबेल पुरस्काराबद्दल बोलताना दिसले. अमेरिका-चीन संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये जागतिक वर्चस्वासाठी लढत आहे.
त्याकरिता अशाप्रकारचे दबाव टाकण्याची कामे सुरू आहेत. पाकिस्तान सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचताना दिसतो. भारताने देखील तसेच वागावे ही डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र, भारत तसे करत नसल्याने त्यांचा जळफळाट उठला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भारताला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. भारता हा रशियाकडून तेल खरेदी करत नसल्याने आपण टॅरिफ लावतोय हे फक्त अमेरिका जगाला दाखवत आहे, कारण वेगळेच आहे.