महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | भारत सरकारच्या संगणक सुरक्षा एजन्सी (CERT-In), ने गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्सच्या यूजर्ससाठी उच्चस्तरीय सुरक्षा इशारा जारी केला आहे. या अलर्टमध्ये एजन्सीने स्पष्ट केले आहे की दोन्ही लोकप्रिय वेब ब्राउझरच्या जुन्या वर्जनमध्ये गंभीर समस्या आढळल्या आहेत. ज्याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार यूजर्सचा संवेदनशील डेटा चोरू शकतात किंवा त्यांच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. सरकारने सर्व यूजर्सना त्वरित त्यांच्या ब्राउझरचे नवीनतम अपडेट्स इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे.
CERT-In च्या मते, Linux वर 141.0.7390.54 आणि Windows व macOS वर 141.0.7390.54/55 पेक्षा जुन्या गुगल क्रोमच्या वर्जनमध्ये विशेषतः काही धोकादायक बग आढळले आहेत. या त्रुटींमध्ये WebGPU आणि व्हिडिओ घटकांमध्ये heap buffer overflow, स्टोरेज आणि टॅब्समधील डेटा लीक आणि मीडिया घटकांमध्ये चुकीचे अंमलबजावणी यांचा समावेश आहे. या समस्यतेद्वारे सायबर हल्लेखोर यूजर्सना धोकादायक वेबसाइट्सकडे वळवू शकतात, रिमोटली कोड चालवू शकतात आणि खाजगी माहितीमध्ये प्रवेश मिळवू शकतात.
याशिवाय, CERT-In ने स्पष्ट केले आहे की iOS 143.0.3 पेक्षा जुन्या आणि 143.1 पेक्षा कमी वर्जनच्या गंभीर समस्या आढळल्या आहेत. यात cookie storage isolation चुकीचे असणे, graphics canvas2D मध्ये integer overflow त्रुटी आणि JavaScript engine मध्ये JIT miscompilation यांसारख्या समस्या समाविष्ट आहेत.
CERT-In ने या दोन्ही वर्जनला ‘उच्च जोखीम’ म्हणून वर्गीकृत केले आहे. एजन्सीने गुगल आणि मोझिलाने वितरित केलेल्या नव्या सुरक्षा पॅचेस लवकरात लवकर इन्स्टॉल करण्याचे सुचवले आहे. दोन्ही कंपन्यांनी या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी ताज्या वर्जनमध्ये सुरक्षा सुधारणा आणल्या आहेत. यूजर्सना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी त्वरित Chrome व Firefox अपडेट करून आपल्या डेटाचे आणि उपकरणांचे संरक्षण करावे. तसेच, अधिकृत CERT-In वेबसाइटवर या वर्जनबाबत सविस्तर माहिती आणि संबंधित सुरक्षा पॅचच्या लिंक उपलब्ध आहेत.