75 मिनिटांचे अंतर फक्त 25 मिनिटांत गाठता येणार; हा महत्त्वकांक्षी प्रकल्प ‘या’ दिवशी खुला होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ ऑक्टोबर | मुंबईकरांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. मुंबई व उपनगरात अनेक प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांत लोकसंख्या वाढत आहे. या दोन्ही शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. सध्या रेल्वे मार्गाने दोन्ही शहरे गाठता येतात. मात्र आता लवकरच मुंबईतून ठाण्याचा प्रवास सोप्पा होणार आहे.

गोरेगाव ते मुलुंड या जोडरस्त्या प्रकल्पाने वेग घेतला आहे. 16 मे 2026पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी लवकरात लवकर या प्रकल्पाला गती द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच, मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे – भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेगाने करावी. या प्रकल्पाच्या रस्ता रेषेने बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनींचे संपादन जलदगतीने करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या

75 मिनिटांचे अंतर 25 मिनिटांत
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पामुळं 75 मिनिटांचे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईतील पूर्ण आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. हा जोडरस्ता 12.20 किमी या मार्ग असणार आहे. यामुळं पूर्व-पश्चिम उपनगराची वाहतूक सुरळीत होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

कसा असेल मार्ग?
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एक चार टप्प्यात प्रस्तावित आहे. टप्पा 3 (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोड बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गंत दिंडोशी-गोरेगाव, फिल्मसिटी दरम्याम सहापदरी उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात येणार असून गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत.

दिंडोशी न्यायालयापासून पुलाची सुरुवात होणार असून रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे 90 अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर फिल्मसिटी रोड येथे उतरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *